लोकन्यायालय म्हणजे काय ?
1. लोकन्यायालय म्हणजे काय? "लोकन्यायालय म्हणजे काय ?" वाद उद्भवला तर तो शक्यतोवर सामंजस्याने सोडवावा हि आपली प्राचीन परंपरा. गावातील जुनी–जाणती मानसे एकत्र येत आणि कोणाही मध्ये उद्भवलेला कुठल्या हि स्वरूपाचा वाद समजुतीने मिटवीत. ज्यांच्यापुढे वाद नेला जाई ते त्या गावातील आदरणीय आणि नि:पक्षपाती लोक असत. यालाच ‘गाव-पंचायत असे म्हणत. सध्याचे ‘लोकन्यायालय’ म्हणजे या गाव पंचायतीचेच आधुनिक रूप, जेथे कायदा जाणणार्या नि:पक्षपाती लोकांचे न्यायमंडळ त्यांच्यापुढे येणार्या प्रकरणांमध्ये सामंजस्याने न्याय्य तडजोड घडवीते. 2. लोकन्यायालय कोठे भरविली जातात ? लोकन्यालये राज्यातील सर्व न्यालयामध्ये नियमितपणे भरविली जातात. प्रतेक जिल्ह्याचा व तालुक्याच्या ठिकाणी दोन महिन्यातून किमान एकदा व आवश्यक भासल्यास त्याहून आधीक वेळा योग्य त्या सूचना देऊन त्या–त्या न्यायालयामध्ये लोकण्यायालयाचे आयोजन केले जाते. जिल्ह्याच्या ठिकाणी होणारी लोकन्यालये जिल्हा न्यायालयात तर तालुक्याच्या ठिकाणी होणारी लोकन्यायालये तालुका कोर्ट परिसरात भरविली जातात. उच्च न्यायालयामध्ये मुंबई येथे तसेच नागपुर आणि ...